बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1 नोव्हेंबर पासून ‘या’ स्मार्टफोन, अॅन्ड्रॉईडफोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार

मुंबई | केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी गेल्या वर्षीं नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. नवीन नियमावलीला मंजूरी देण्यासाठी केंद्र सरकारने शेवटची 26 मे तारीख दिली होती. त्यानंतर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर या नियमावलीचे निर्बंध लागू झाले होते. अशातच आता व्हॉट्सअॅपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फिचर दिले आहेत.  व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आलेले नवे फिचर अपडेट्स स्मार्टफोन आणि त्याचे सॉफ्टवेअर जुन्या स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करणार नाही. त्यामुळे त्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आता बंद होणार आहे.

व्हॉट्सअॅप बंद करणार असलेल्या स्मार्टफोनची यादी नुकतीच व्हॉट्सअॅपकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये स्मार्टफोनमधील सपोर्ट व्हॉट्सअॅप 1 नोव्हेंबर 2021 पासून संपवणार आहे. ते व्हॉट्सअॅपकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये साधारण अॅन्ड्रॉईड फोन आणि स्मार्टफोनचा समावेश असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

एलजी सीरिजमधील एलजी ल्युसिड 2 आणि ऑप्टिमस एफ 7, एफ 5, एल 3, एल 5, एलड्युल, एल 7, एल 7 दोन , एल 7 ड्युअल, एफ 6 इन्यक्ट, एल 4 दोन ड्युअल, एफ 3, एल 4 दोन, नायट्रो एचडी आणि एफ 3 डी, या स्मार्टफोनमधील सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. चायनीज कंपनी झीटीव्हीच्या सीरीजमधील झीटीव्ही ग्रॅंड एस फ्लेक्स, व्ही 956 एक्स क्वाड व्ही 987 आणि ग्रॅंड मेमो मधील सपोर्ट बंद होणार आहे.

दरम्यान,  ह्युवोईच्या असेंन्टमधील जी 740 मेट डी 1 क्वाट एक्स एल, पी 1 एस आणि डी 2 मध्ये देखील नोव्हेंबर पासून व्हॉट्सॅअॅप काम करू शकणार नाही आहे. त्याचबरोबर सोनीच्या एक्सपेरीया मायरो, नियो एल, आणि आर्क यांचा देखील या यादीत समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव नाही तर….- देवेंद्र फडणवीस

जगात जे काही सर्वोत्तम आहे, ते मुंबईला देण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

तालिबानविरोधात भारत ठरणार किंगमेकर???; दोन महासत्तांनी भारताकडे मागितली ‘ही’ मोठी मदत

‘मुजोर माजी मंत्रिपुत्राच्या मुसक्या आवळा’; स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन

राऊतांच्या 2 अपेक्षा, भाजपचे 5 प्रश्न; राऊत-भाजप वाकयुद्ध रंगलं!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More