नवी दिल्ली | शुक्रवारी रात्री अचानक सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म असलेल्या फेसबुकसह त्याच्याशी संलग्न असलेल्या मेसेंजर आणि व्हाॅटस अॅपची सेवा जगभरात काही काळासाठी ठप्प झाली होती. तिन्ही प्लॅटफाॅर्मवर यूझर्सना अडचणी येत होत्या मात्र काही काळातच या सेवा सुरळीत करण्यात फेसबुकला यश आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यावर रात्री उशीरा व्हाॅटस अॅपकडून अधिकृत स्पष्टीकरण करण्यात आली. रात्री 12 वाजून 11 मिनिटांनी व्हाॅटस अॅपने त्यांच्या ट्विटर अकांऊटवरून ट्विट करत याची अधिकृतपणे माहिती दिली. ही 45 मिनिटं आमच्यासाठी खूप मोठी होती. यूझर्सने दाखवलेल्या संयमाबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही आता परत आलोय, असं ट्विट व्हाॅटस अॅप केलं होतं.
शुक्रवारी सर्वात आधी व्हाॅटसअप डाऊन झाल्याचं समोर आलं. यामध्ये यूझर्सला मेसेज पाठवताना, फोटो पाठवताना तसेच फोटो डाऊनलोड करताना अडचणी येत होत्या. तसेच जीआयएफ किंवा स्टीकरही जात नव्हते. दुसरीकडे मेसेंजरवरही मेसेज जात नसल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, सिग्नल या व्हाॅटस अॅपच्या प्रतिस्पर्धी अॅपने व्हाॅटस अॅपला टोला लगावला आहे. सिग्नलने ट्विट करत सांगितलं आहे की, या 45 मिनटात आमच्या युझर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. व्हाॅटस अॅपसोबत आमच्या सहभावना आहेत, असं सिग्नलने म्हटलं आहे. तर वीकेंड डाऊनटाईम काय असतो हे टेकच्या बाहेरील लोकांना माहित नाही, असं म्हणतं या सेवा ठप्प होण्यामागील कारण सिग्नलने सांगितलं आहे.
पाहा ट्विट-
Thanks for your patience, that was a long 45 minutes but we are back! #WhatsAppDown
— WhatsApp (@WhatsApp) March 19, 2021
Thanks for your patience, that was a long 45 minutes but we are back! #WhatsAppDown
— WhatsApp (@WhatsApp) March 19, 2021
थोडक्यात बातम्या-
‘या’ कारणामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार!
एक दोन नव्हे तर सलग तीन वेळा जो बायडन विमानात चढताना पडले, पाहा व्हिडीओ
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”
…म्हणून चक्क संजय राठोड यांच्याच गाडीपुढे झोपला युवक!
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…
Comments are closed.