बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Wheather Update: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

पुणे | उन्हाळा सुरु झाला असून उन्हाची झळही जाणवू लागली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे नागरिकही मोठ्या प्रमाणावर चिंतेत आहेत. अशातच अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.

पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढली आहे. वाऱ्याच्या संगमामुळे व Trough in Easterlies केरळ किनारा ते कोकण किनार्‍यापर्यंत 8-10 मार्चला महाराष्ट्र, गुजरात, पू. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाटासह, जोरदार वाऱ्यासह, हलका, मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

8-9 मार्च उत्तर मध्य महाराष्ट्रात व 9 मार्च लगतच्या मराठवाड्यात गारपीटची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास हवामान विभागानं सांगितलं आहे.

दरम्यान, उद्या कोकणासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजपचं टेन्शन वाढलं! प्रियंका गांधींबाबत काँग्रेस लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी लवकरच जेलमध्ये जाणार”

‘किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे वसुली एजंट’; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

“महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच धाडी का?, भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?”

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, संजय राऊतांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More