बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलांबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच तालिबानी हसायला लागले, ‘हा’ व्हिडीओ व्हायरल!

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडून पलायन केलं आहे. तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यामुळे तेथे भीतीचं वातावरण आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडून जाताना दिसत आहे. कारण तालिबानी त्यांच्या नागरी स्वातंत्र्यावर गदा आणतील, अशी भीती त्यांना आहे. त्यातल्या त्यात महिलांना जास्त भीती आहे. अशातच तालिबान्यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वाईस न्युजचा आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला पत्रकार तालिबान्यांशी संवाद साधत आहे. ती महिला पत्रकार तालिबान्यांना लोकशाहीने महिलांना दिलेल्या हक्कांबाबत विचारत आहे?, यावर उत्तर देताना तालिबानी युवक म्हणाले की, शरिया कायद्याच्या अंतर्गत पालन करावं लागेल. त्यानंतर आणखी एक प्रश्न महिला पत्रकाराने त्यावर तालिबानी युवक फक्त हसताना दिसत आहेत.

तालिबानी लोकशाही मार्गाचा स्वीकार करणार का? आणि लोकांना महिला राजकारण्यांना मतदान करण्याची परवानगी देतील का, असा प्रश्न महिला पत्रकाराने केल्यावर तालिबानी हा प्रश्न ऐकताच त्यांना हसू आलं आणि ते इतकं हसू लागले की त्यांनी चित्रीकरण हे थांबवायला सांगितलं आणि हसतच राहिले.

दरम्यान, या व्हिडीओवरून तालिबान्यांची महिलांच्याबाबतीत मानसिकता कशा प्रकारची आहे हे लक्षात येतं.  त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या महिला तणावामध्ये आहेत.

 


थोडक्यात बातम्या- 

भाजपने राज्यातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही- उदय सामंत

‘NDA परीक्षेत महिलांना संधी द्या’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

“नरेंद्र मोदींनी 4-5 वर्ष घेतलेल्या कष्टामुळे नीरज चोप्रासारखी मुलं ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकत आहेत”

मद्रास उच्च न्यायालयाने सीबीआयला म्हटलं पिंजऱ्यातील पोपट; केंद्र सरकारला दिले ‘हे’ आदेश

हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केल्याने स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More