बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”

मुंबई | राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण  देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरिकांना मोडर्नाची लस देण्याचं काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे. जर भारतातील नागरीकांना परवानगी मिळत नाही, मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

देशभरात लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘देशात लसीचा तुटवडा असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. केंद्र सरकारनं भारत बायोटेक, सिरम इन्स्ट्यिट्यूट आणि स्पुतनिकला परवानगी दिली आहे. असं असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला मोडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे’, अशी माहिती मिळाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

फ्रान्समधील नागरिक भारतात आणि मुंबईत आहेत. त्यांना मोडर्नाची लस देण्यासाठी काही रूग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. दुतावासातील भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. तर, 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सध्या स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तर,कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही टोपे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”

खूशखबर! उद्या केंद्र सरकारतर्फे 19 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

”शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

पत्नीने केली आत्महत्या, माहिती मिळताच पतीने देखील घेतला गळफास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More