बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात, तेव्हा ते आपल्या मुली…”; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

भोपाळ | भोपाळचे भाजप आमदार रामेश्वर शर्मा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच सागर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्याने राजकारण तापलं आहे. शर्मा यांनी लोक सत्तेसाठी मुलीला पणाला लावतात, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कार्यक्रमात बोलताना रामेश्‍वर यांनी हिंदुत्वावर भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी जोधा-अकबर यांचा प्रेम विवाह नसून उलट सत्तेसाठी मुलीला पणाला लावले होते, असं म्हटलं होतं. जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात आणि सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध राहा, ते तुमचे आहेत पण धर्माचा विश्वास घात करू शकता असे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

जोधा अकबर यांच्यात काही प्रेम होतं का?, दोघे कोणत्याही महाविद्यालयात भेटले का?, कॉफी हाउसमध्ये भेटले का?, जिममध्ये भेटले का?, असे अनेक सवाल रामेश्‍वर यांनी यावेळी विचारले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजपुतांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रामेश्वर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजपुत समाज प्रचंड संतापला आहे. लोकांमधील संताप वाढताना पाहून रामेश्वर यांनी एक निवेदन जारी करत माफी मागितली आहे.

थोडक्यात बातम्या-

#Breaking पंजाब काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मराठवाड्यात पावसाचं थैमान! 35 जणांचा मृत्यू तर 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More