नवी दिल्ली | चीनमध्ये मुलाच्या लग्नाच्याच दिवशी होणारी सून ही आपल्या पोटची मुलगी असल्याचं वराच्या आईला समजताच संपूर्ण मंडपात एकच खळबळ उडाली. होणारी सून अर्थात वराच्या आईची मुलगी ही 20 वर्षांआधी बेपत्ता झाली होती, अशी माहिती समोर आली.
मुलाच्या आईला होणाऱ्या सुनेच्या हातावर जन्मखूण दिसली. तिची जी मुलगी हरवली होती तिच्याही हातावर अशीच खूण होती. ती खूण दिसल्यावर मुलाच्या आईने वधूच्या पालकांना विचारलं की या मुलीला त्यांनी 20 वर्षांपूर्वी दत्तक घेतलेलं आहे का?. या सवालाने गोंधळ उडाला कारण ते एक गुपित होतं.
20 वर्षांआधी अगदी छोटी मुलगी रस्त्याच्या कडेला सापडली आणि तिला आम्ही आमची मुलगी म्हणून वाढवलं, असं उत्तर मुलीच्या पालकांनी दिलं. मुलीच्या पालकांचं उत्तर ऐकताच माझ्या खऱ्याखुऱ्या आईला भेटतेय हा क्षण लग्नाच्या दिवसापेक्षाही आनंदाचा आहे, असं म्हणत मुलीचे डोळे पाण्याने भरुन आले.
दरम्यान, आपल्या मोठ्या भावाशी लग्न कसं करायचं याची काळजी मुलीला पडली. यावर मुलीच्या आईने देखील वराला दत्तक घेतलं असल्याचं सांगितलं. मुलगा आणि मुलीचं कोणत्याही प्रकारे रक्ताचं नातं नसल्याने या लग्नाला दोन्ही घराकडून कसलीच हरकत नव्हती. तसेच मुलगी हरवल्यानंतर आईने तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिचा शोध लागला नाही. जेव्हा मुलगी सापडली नाही तेव्हा आईने मुलगा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
थोडक्यात बातम्या-
‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी
“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”
शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन
शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.