बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्यावेळेस ‘ते’ येतील त्यावेळी ते भावी सहकारी – बाळासाहेब थोरात

मुंबई | औरंगादबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजप युतीचे संकेत दिले आहेत. मंचावर उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे इशारा करत त्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर आता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे.

आज मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं. यासंदर्भात अगोदर त्यांना विचारलं पाहिजे. पण दुसरीकडे भाजपमध्ये नैराश्य असल्यानं आज अनेकजण महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांकडे येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे, ज्यावेळेस ते येतील त्यावेळेला ते भावी सहकारी होतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. आमच्या हक्काचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडे अडकला आहे. तो केंद्राकडे 30 ते 40 हजार कोटींच्या घरात असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तर केंद्राने हा पैसा तात्काळ दिला पाहिजे, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. तर उर्वरित 3 वर्षांचा कार्यकाळ देखील पुर्ण करेल, असा विश्वास देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाचा नवा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतले डोस

“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले?”

ह्रदयस्पर्शी! ‘या’ लहानग्याची पंतप्रधान मोदींना आर्त हाक; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More