सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या अनोख्या स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असतात. आज त्यांनी चक्क डंपर चालवत साताऱ्यामध्ये फेरफटका मारला.
सातारा नगरपरिषदेने शहरातील विविध कामांसाठी जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर खरेदी केले होते. त्याचे पूजन खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी डंपर चालवत शहरातून फेरफटका मारला.
दरम्यान, उदयनराजेंच्या डंपर चालवल्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. मात्र सातारकरांसाठी ही एक पर्वणीच होती.
25 सातारा खा.उदयनराजे यांनी चालवला डंपर
*पहा उदयनराजे डंपर सवारी* व्हिडिओ प्रमोद इंगळे pic.twitter.com/LgWUtVA35Y— Pramod Ingale (@pramodsakaal) August 25, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली
-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन
-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!
-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट