देश

“पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोनावर लस येण्याची शक्यता”

नवी दिल्ली | पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोनावर लस येण्याची शक्यता आहे असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र येत्या दोन ते तीन महिन्यात कोरोनावरची लस शोधण्यात यश मिळेल, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. भारत जगात सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. याबाबत डॉ. गुलेरिया यांना विचारलं असता कोरोनाचे रुग्ण कमी कसे होतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहोत, असं गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

सध्याच्या घडीला मृत्यू दराचा विचार केला तर जगाच्या तुलनेत भारताचं हे प्रमाण नक्कीच कमी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काही केसेस वाढतील, असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउन संपला म्हणजे कोरोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे, असं गुलेरिया यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

कोरोनाच्या गंभीर रुग्णांनाच बेड मिळावा- किशोरी पेडणेकर

‘निसर्ग’ आपत्तीत ठाकरे सरकार जनतेच्या पाठीशी- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या