बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाच असतो”

मुंबई | दाक्षिणात्य लोकप्रिय जोडी नागाचैतन्य आणि समांथानं नुकतांच घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. दोघांनीही पोस्ट शेअर करत याबद्दलची पुष्टी केली. अशातच आता त्यांच्या घटस्फोटावर अभिनेत्री कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनानं सोशल मीडियावर नागाचैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा नेहमी पुरूषांचाचं असतो. माझं हे बोलणं तुम्हाला जजमेंटल वाटत असेल. पण देवाने पुरूष आणि महिलांना असंच बनवलं आहे. अशा लोकांवर दया करणं बंद करा जे महिलांना कपड्यांप्रमाणे बदलतं राहतात आणि नंतर त्यांच्यासोबत मैत्री ठेवतात. यामध्ये शंभरामधील एक महिला चुकीची असू शकते सर्वांची नाही.

पुढे कंगनानं म्हटलं की, घटस्फोट घेतलेला हा साऊथ अभिनेता अलीकडेच एका बॉलिवूड सुपरस्टारच्या संपर्कात होता. ज्याला बॉलिवूडच्या घटस्फोटाचा तज्ज्ञ मानलं जातं. त्यानं अनेक महिला व मुलांचं आयुष्य बर्बाद केलं आहे. अनेकांना त्यानं भडकवलं. मी कोणाबद्दल बोलतेय, ते सर्वांनाच माहितीये. कंगनाच्या या पोस्टमध्ये बॉलिवूडच्या त्या सुपरस्टारचं नाव न घेता आमिर खानवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, गेली अनेक दिवस खटके उडत असल्याचं म्हटलं जात होतं. काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जात होतं की समंथा नागाचैतन्यचा घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे. त्यांच्या घटस्फोटानंतर चाहते खूप नारज असल्याचं दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव; भाजपकडून शिवसेना नेत्याला विधानसभेची उमेदवारी

एनसीबीनं ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर!

मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु

निवृत्त प्राध्यापकानं केलं असं काम, दोन वर्षात गाव झालं दुष्काळमुक्त!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More