बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवारांचा एकेरी उल्लेख करणं पाटलांना शोभतं का? कुठे हिमालय, कुठे टेकाड टेंगूळ”

मुंबई | सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर राजकीय वर्तुळातून पाटलांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटलांनी आदरणीय शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. पाटलांना हे शोभतं का? कुठे हिमालय आणि कुठे टेकाड टेंगुळ? तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. तुम्हाला बोलायचंच असेल तर अतिरेक्यांसंदर्भात बोला त्यांना दम द्या, असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तसेच यावेळी संजय राऊत यांनी राज्यातील मंत्र्यांना भाजप विरोधात दंड थोपटण्याचे आव्हान देखील केले आहे. फक्त खुर्च्यांवर बसून राहू नका. यांच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करा. टोल्याला टोला द्या, असं आव्हान राऊतांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, सांगलीत एका कार्यक्रमात शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, आपल्याला शरद पवारचं आव्हान नाही. कारण 54 आमदारांच्या वर आम्ही त्याला केव्हा जाऊच दिलं नाही. संपूर्ण आयुष्य गेलं पण हा केव्हा 60 वर गेला नाही.

थोडक्यात बातम्या –

“ईडी, सीबीआय यांच्यासह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मिरला पाठवा”

‘निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटले, खायला मटन मासे पुरवले’; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

“यंत्रणांच्या धाडीमुळे महाराष्ट्र कधीच मागे हटणार नाही, तो अशा गोष्टींसमोर झुकत नाही”

“सरकारची प्रतिमा जपण्यासाठी सर्वांना समोर येऊन बोलावं लागेल, हे 8 दिवसात पळून जातील”

मोठी बातमी! दिवाळीनंतर ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More