बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता ते जिथूनही निवडणूक लढतील, मी त्यांना जिंकू देणार नाही”

नवी दिल्ली | पंजाब विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं राजकीय हालचाली होत असलेल्या पहायला मिळत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशा चर्चा होत्या. मात्र, आपण भाजपमध्ये सामील होणार नसल्याचं अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलंय. त्यानंतर त्यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना नवीन पक्ष काढत असल्याची शक्यता व्यक्त केली. यावेळी त्यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत ते जिथूनही निवडणूक लढतील, मी त्यांना जिंकू देणार नाही. सिद्धू पंजाबसाठी योग्य नाहीत, असं टीकास्त्र अमरिंदर यांनी सोडलं आहे.

सिद्धू यांचं काम पक्ष चालवण्याचं आहे. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचं काम सरकार चालवणं आहे. यामुळे सरकार चालवताना कुठलाही हस्तक्षेप करू नये, असा टोलाही अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंना लगावला.

दरम्यान, सध्या तरी मी काँग्रेस पक्षात आहे, मात्र भविष्यात मी काँग्रेसमध्ये असणार नाही. पक्षात मला मिळालेली वागणूक मान्य नाही. आपण लवकरच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचार करू, असं अमरिंदर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

पंजाब किंग्जला मोठा धक्का! ‘युनिव्हर्सल बाॅस’ आयपीएलमधून बाहेर

दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये, मात्र… – उदय सामंत

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

“डोकंच नसेल तर शरीराचा काय फायदा? सेनापतीच नाही तर लढायचं कसं?”

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More