बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे?, टाळी एका हाताने वाजत नाही”

मुंबई | निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालाबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देत आहे त्याचा शोध घ्या, अशी टिका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे भाष्य केलं आहे. ‘पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली आहे. मात्र, या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूनं शांतता राखली पाहिजे. केंद्राला आणि बंगालच्या सरकारला संयमाने राहावं लागेल. बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी. कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावं. एकमेकांना धमक्या देणं थांबवावं, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे’, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचं अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीनं धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणं, तुरुंगात टाकणं या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही.

दरम्यान, भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे. भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल’, असा टोलाही शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

नाशिकमध्ये छातीत दुखून अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम 2 दिवसांत चक्क 5 जणांचा मृत्यू 

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More