मुंबई| महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं सर्व पर्यटन स्थळं त्याचबरोबर धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अजंठा-वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि तुळजापूर येथील तुळजाभवानीचे मंदिर यांचा समावेश आहे.
नेहमीच गर्दी असणाऱ्या मुंबई मंत्रालयात देखील नागरिकांना जाण्यास मज्जाव केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, मॉल्स आणि सिनेमागृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहोचली असून देशात 110 जण कोरोनाबाधित आहेत. राज्य सरकारतर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत.
दरम्यान, आपल्यासाठी पुढचे 15 ते 16 दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. शासनाच्या संपर्कात राहा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका त्यासोबत सर्व नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
तुलामला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ
“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळं निवडणूका पुढे ढकलाव्यात; राज्यसरकारची निवडणूक आयोगाला मागणी
पूर्णपणे शटडाऊन नको असेल तर स्वयंशिस्त पाळा- मुख्यमंत्री
“भाजपने स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतला म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले”
Comments are closed.