बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी ठाकरे… माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय”

नाशिक | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्व राजकीय पक्ष तयारी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिकमध्ये पदाधिकाऱ्याची बैठक घेत आहेत. त्यावेळी त्यांनी पुन्हा नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

आम्हाला कार्यक्रम करण्याची सवय आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही. फार बोलत नाही पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, असंही राऊत यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नारायण राणे यांना टोला लगावला.

मी ठाकरे आहे. माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले. एक तरी भाजपाचा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये तरी आहे का?, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मी मुंबईत राहतो. पण मंत्रालयाकडे फिरकतही नाही. मी दिल्लीत गेलो की लोक बाजूला होतात. माझ्यातली छातीवर वार घेण्याची पॉवर ही खरी सत्ता आहे. सत्ता सदैव बाळासाहेबांची होती. चंदनाच्या चितेवर जाई पर्यंत बाळासाहेबांची सत्ता राहिली, असं भावनिक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हा पठ्ठ्या बघा…’; भर कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी

राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

महापालिका जिंकायचीच, संजय राऊतांनी टाकलं पहिलं पाऊल

“कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More