बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका लग्नाची अनोखी गोष्ट; तरुणीशी निकाह करण्यासाठी तीन तरुणांचा दावा

लखनऊ | अनेक वेळा आपण लग्नात काही तरी अगळं-वेगळं झाल्याचं ऐकतो. तर अनेक वेळा काही तरी राडाच होतो. मात्र लखनऊ येथील एका लग्नात एक अजबच प्रकार घडला आहे. निकाह चालू असतानाच दोन युवकांनी येऊन लग्नाचा दावा केल्यामुळे एकीसोबत लग्न करायला तीन जणांनी मंडपात राडा घातला आणि अखेर एकासोबत तरुणीचा निकाह पार पडला.

लखनऊ येथे एका तरुणीचा निकाह पार पडत असतानाच एक तरुण मंडपात आला. या तरुणाने संबंधित नवरी ही आपली पत्नी असून तिच्यासोबत आपलं लग्न झालं असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांना त्याने निकाहनामाही दाखवला. तरुणीची आई दमदाटी करुन तिचा विवाह दुसरीकडे लावत असल्याचं या तरुणाने सांगितलं.

हा तरुण मंडपात असतानाच आणखी एक तरुण वऱ्हाड घेऊन मंडपात पोहोचला. तसेच संबंधित दुसरा तरुण हा नवरीचा प्रियकर असल्याचं या तरुणाने सांगितलं. यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या तरुणामध्ये बाचा-बाची झाली आणि मंडपात गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र प्रकरण ऐकून पोलीस देखील कोणतीही कारवाई न करता निघून गेले. यानंतर पंचायत बसवण्यात आली.

दरम्यान, पंचायतमध्ये संबंधित तरुणीचं मत जाणून घेण्यात आल्यानंतर आपल्याला फक्त एकाच मुलाशी लग्न करायचं असल्याचं तिने सांगितलं. यानंतर ज्या तरुणासोबत पहिला विवाह झाला होता त्याला निकाहचा खर्च देऊन परत पाठवलं. तर प्रियकराला मुलीची आणि त्याची जात वेगळी असल्याने लग्न होऊ शकणार नाही असं सांगून परत पाठवलं. अखेर ठरलेल्या नवरदेवासोबत तरुणीचा विवाह पार पडला. मात्र या घटनेने संपुर्ण गावात एकच चर्चा रंगली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More