बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तामिळनाडूत कोणी केला कमल हसन यांचा पराभव?

चेन्नई | काल देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देशात प्रतिष्ठेची समजली जाणारी अशी निवडणूक बंगाल विधानसभा निवडणूक ठरली. या निवडणुकीबरोबरच तामिळनाडूमध्येही प्रसिद्ध अभिनेते कमल हसन हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

कमल हसन हे चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. 2018 मध्ये त्यांनी स्वतःचा मक्कल निधी मय्यम हा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभेतही ते निवडणूक लढले पण त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे होते.

कोईम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांचा सामना वनाथी श्रीनिवासन यांच्याशी होता. वनाथी श्रीनिवासन या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. श्रीनिवासन यांनी कमल हसन यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव केला. तसेच पहिल्या क्रमांकाची मतं मिळवून त्यांची कोइंबतूर दक्षिणच्या आमदार पदी वर्णी लागली.

ही लढत अत्यंत चुरशीची असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण सुरुवातीला मतमोजणी सुरू झाल्यापासून मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक तसेच अभिनेते कमल हसन हे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्यामुळे मतदारसंघात कमल हसन यांना संधी मिळणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यानंतर वनाथी श्रीनिवासन यांनी लीड मोडून काढत आघाडीवर येऊन अखेर मतमोजणीच्या शेवटी कमल हसन यांच्यावर विजय मिळवला. सुरुवातीला कमल हसन जिंकणार असं वाटत असतानाच भाजप महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांनी शेवटी बाजी मारली.

थोडक्यात बातम्या

#सकारात्मक_बातमी 20 टक्के फुफ्फुस काम करत असताना देखिल महिलेची कोरोनावर मात

पुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या 24 तासातील मृतांची आकडेवारी चिंताजनक

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्सवर विजय, धवनची जबरदस्त अर्धशतकी खेळी

धक्कादायक! हळदीच्या आदल्या दिवशीच धारदार हत्याराने युवकाचा खून

बकरी, गाय, झोपडी ही संपत्ती, रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी झाली आमदार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More