Top News

मराठा आरक्षणासाठी आमदारकी सोडणारे हर्षवर्धन जाधव कोण आहेत?

आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय प्रवास-

-हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत. औरंगाबादमधील कन्नड या मतदारसंघातील ते आमदार आहेत.

-माजी मंत्री रायभान जाधव व माजी आमदार तेजस्विनी जाधव यांचे ते पुत्र आहेत.

-हर्षवर्धन जाधव हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

-संजया हर्षवर्धन जाधव असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे.

-काँग्रसेतर्फे ते जिल्हा परिषद सदस्य होते. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधानसभेची निवडणूक लढवली व विजय मिळवला होता.

-विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी झाली, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र अजित पवार यांच्या मध्यस्थीने 24 तासात त्यांनी राजीनामा परत घेतला होता.

-मनसे पक्ष माझ्यााविरोधात आहे म्हणत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. नंतर शिवसेनेची वाट धरत ते आमदार झाले.

– हर्षवर्धन जाधवांचा काँग्रेस मनसे आणि शिवसेना असा राजकीय प्रवास झाला आहे.

-औरंगााबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव एकाच पक्षाचे असून ते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.

– पोलिसाला मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधवांना एक वर्षाची शिक्षा झाली होती.

-औरंगाबादमधील कचरा प्रश्नावरून आपल्याच पक्षाचे खासदार चंद्रकांत खैरेंना त्यांनी कोंडीत पकडलं होतं.

-मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढला नाहीतर राजीनामा देईल असा इशारा त्यांनी दिला होता.

– मराठा आंदोलनासाठी राजीनामे देणारे ते पहिलेच मराठा आमदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनकर्त्यांचं कौतुक; आंदोलनातही अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

-बीडमध्ये आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या