बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे?’; रामदास कदम आक्रमक

मुंबई | शिवसेनेचे नेते रामदास कदम (Shivsena Leader Ramdas Kadam) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. त्यांच्यावर अनेक आरोपसुद्धा करण्यात आले होते. यासंबधीत त्यांना आज पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे? असा आम्हाला प्रश्न पडला आहे,” असा टोला यावेळी रामदास कदमांनी लगावलाय. “अनिल परब राष्ट्रवादीचे नेते असल्यासारखं वागत आहेत. अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी लगावले आहेत.

अनिल परबांनी यावेळी मला राजकारणातून उद्धवस्त करण्याचा डाव आहे, असा आरोप करत पुढे त्यांनी अनिल परब गद्दार आहेत, असंही वक्तव्य केलं आहे. माझ्या मुलाला तिकीट न देण्यासाठी अनिल परब यांनी काम केलं. पण उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलाला तिकीट दिलं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर आरोपाचं सत्र सुरु झालं होतं. यावरून रामदास कदम यांनी ‘बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, आज पर्यंत मी सोमय्या यांच्या सोबत बोललो पण नाही. त्यांना मी कोणतीही माहिती दिली नाही, असा खुलासा केला आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! बूस्टर डोस घेऊनही Omicronची लागण

‘संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण…’; गडकरी म्हणतात…

उठ मराठ्या उठ! महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

‘…नाही तर राज्य अंधारात जाईल’; अशोक चव्हाण यांचा गंभीर इशारा

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, शिवप्रेमी आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More