औरंगाबाद महाराष्ट्र

दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

जालना | डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला एटीएसनं अटक केली. नालासोपाऱ्यातून अटक झालेल्या संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने जालन्यातून श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली.

कोण आहे श्रीकांत पांगारकर?

-श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा सलग 10 वर्ष नगरसेवक होता. त्याचे वडिल जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे.

-श्रीकांता पांगारकरचा जालन्यात स्वस्त दरात धान्य व रॉकेलचा व्यवसाय होता.

-जालन्यात शिवसेना जोमात असताना त्याने शिवसेनेत प्रवेश घेतला होता. 2001 ते 2011  या कालावधीत तो शिवसेनेचा नगरसेवक होता. त्यानंतर 2011 मध्ये त्याने शिवसेनेला राम-राम ठोकला.

-शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करु लागला. पांगारकर विवाहित असून दोन वर्षांपूर्वी तो आई, पत्नी आणि मुलींसह औरंगाबादमध्ये स्थायिक झाला.

-श्रीकांतच्या घरातील संरक्षक भिंतीजवळ पोलिसांना एक जुनी जळालेली दुचाकी आढळल्याचं समजतंय.

-पोलिसांनी श्रीकांतच्या औरंगाबाद येथील घराची पाहणी केल्याचं समजतंय.

-पांगारकर हा कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा आहे.  तसेच हिंदुत्ववादी संघटनेत काम करताना तो केदारनाथमधील जलप्रलयानंतर तिथे मदतकार्यासाठी देखील गेला होता, असे समजते.

महत्त्वाच्या बातम्या-

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या