पुढच्या टार्गेटवर कोणता मंत्री असणार?, किरीट सोमय्या म्हणाले….
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर थेट आरोप करत पाठपुरावा करत आहेत. आता किरीट सोमय्यांच्या रडारवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असल्याचं दिसतंय.
येत्या शुक्रवारी किरीट सोमय्या पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असणार आहे. हे सरकार 50 वर्षे चालू दे, मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया 50 दिवसांत सरळ होणार आहे, असा इशारा किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांवर थेट आरोप केले आहेत.
माफिया सेना स्वत:ला वाचवण्यासाठी आता यशवंत जाधवांच्या आईचं नाव घेत आहे. यशवंत जाधव आपल्या आईला 50 लाखांचं घड्याळ देतील का?, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच मला आशा आहे की, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दिलेले 50 लाखांचे बिल आणि त्यावरील भरलेला जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल, असं म्हणत अजित पवारांनाही लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनाही किरीट सोमय्यांनी टार्गेट केलं होतं. एक प्रतिकात्मक हातोडा घेऊन अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले होते. त्यातच आता किरीट सोमय्यांच्या रडावर हसन मुश्रीफ असतील असं सोमय्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी ! मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना मोठा दिलासा
अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार?, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
“राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही वीज पुरवठा थांबणार नाही”
“हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?”
Russia Ukrain War | रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं ‘हे’ शहर उद्ध्वस्त, इतक्या लोकांचा मृत्यू
Comments are closed.