बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

मुंबई | 2 ऑक्टोबरला मुंबईत एनसीबीच्या कारवाईत बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यासह देशात मोठी खळबळ माजली होती. आर्यन खान प्रकरणाच्या कारवाईचं नेतृत्व करणारे एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. अशातच आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी आर्यन खान प्रकरणावर भाष्य केलं आहे.

उच्च न्यायालयानं नुकतंच आर्यन खानच्या प्रकरणावर महत्त्वपुर्ण सुनावली केली आहे. आर्यन खानकडं कसल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नाही. तसंच त्याच्या व्हाॅट्स अॅप चॅटमध्ये कसलीही संशयास्पद माहिती मिळाली नसल्याचं न्यायलयानं म्हणाताना एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावरूनच आता विविध क्षेत्रातील मान्यवर आर्यन खानच्या बाजूनं उभं ठाकल्याचं पहायला मिळत आहे.

आर्यन आणि त्याच्या कुटुंबीयांनी जे भोगलं त्याची भरपाई कोण देणार?, असा सवाल दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी विचारला आहे. परिणामी संजय गुप्ता यांचा रोख आर्यन खान प्रकरणावर बेजबाबदारपणे भाष्य करणाऱ्या प्रत्येकाकडं होता. आर्यन खान निर्दोष होता आणि आहे तर हे प्रकरण का झालं?, असंही संजय गुप्ता म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आर्यन खान प्रकरणावरील महत्त्वपूर्ण सुनावणीनंतर सर्वस्तरातून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं’; भाजपची खुली ऑफर

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांच्या काळात…”

“गावातली ग्रामपंचायत तरी खडसेंच्या ताब्यात आहे का?”

‘नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार’; चंद्रकांत पाटलांचा दावा

“गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More