बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही आरक्षणाचा खेळ का करताय? हे विधेयक म्हणजे भिजलेला फटाका”

नवी दिल्ली | राज्य सरकारांना एखाद्या समाजास मागसवर्ग निश्चित करण्याचा अधिकार देणारे घटना दुरूस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. परंतु, आरक्षण देण्यास 50 टक्के मर्यादा असल्यानं राज्य सरकारांचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सराकरवर टीकेची झोड उठवली आहे.

केंद्र सरकारने संसदेत मांडलेले हे विधेयक म्हणजे भिजलेला फटाका आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. थेट 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काढून राज्यांना अधिकार द्या, तुम्ही आरक्षणाचा खेळ का करताय?, असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकली जात नाही, तोपर्यंत केंद्राने मांडलेल्या या विधेयकाचा काहीही फायदा नाही, असं रोखठोक मत देखील त्यांनी मांडलं आहे.

आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या कोर्टात टाकून उगाच खेळत बसू नका. हा राजकारणाचा विषय नाही. अपवादात्मक परिस्थिती असं काही नसतं, असंही संजय राऊत म्हणाले. त्याचसोबत त्यांनी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर देखील टीका केली आहे. हा सर्व विषय ओबीसी आरक्षणाचा आहे. हा सर्व विषय कोणी सुरू केला हे प्रीतम मुंडे यांना माहिती पाहिजे, असं देखील संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मला आश्चर्य वाटतं की, भाजप खासदारांनी या विषयावर तोंड का उघडलं नाही? त्यांनी सुद्धा या विषयी पुढं येऊन बोलायला पाहिजे होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे यांसारखे नेते लोकसभेत का बोलले नाहीत?, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

दीर्घकाळासाठी मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव राहणार – WHO

आता ‘या’ दिवशी साजरा होणार ‘राष्ट्रीय भालाफेक दिन’

“…तोपर्यंत RSSचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा”

भारतातील ‘ही’ चार मोठी शहरं पाण्याखाली जाणार; IPCC चा धक्कादायक रिपोर्ट

कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More