बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर का पडावं लागलं?”

मुंबई | काल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. राज्यातील भाजप नेत्यांवर तसेच केंद्र सरकार देखील हल्लाबोल केला. त्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं. खरं तर त्यांना या गोष्टीचा विसर पडला की जनतेने भाजपला नाकारलं नाही. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं. तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून तुम्ही सत्तेत आलात. हे बेईमानीने सरकार सत्तेत आलंय. आता तरी मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं की त्यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वकांक्षा होती.

दिलेला शब्दच पुर्ण करायचा होता तर इतरांना मुख्यमंत्री करायचं होतं. दिवाकर रावते होते, एकनाथ शिंदे होते किंवा सुभाष देसाई होते. मुख्यमंत्री होयचं नव्हतं तर नारायण राणे यांना पक्षातून बाहेर का जावं लागलं? आणि राज ठाकरेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?, असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय. आमच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असंही इशारा देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

‘राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि…’; शार्लिन चौप्राचा गंभीर आरोप

‘…म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

फडणवीस-मुंडे वाद पुन्हा शिगेला???; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांनी सोडली पत्रकार परिषद

…जेव्हा ‘द वाॅल’ म्हणतो, “तो माझ्यासाठी काही अभिमानाचा क्षण नव्हता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More