बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून दिशाला स्वत:लाच स्क्रिनवर बघायला आवडत नाही, दिशाच्या खुलास्याने चाहतेही हैराण

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)आपल्या अदाकारांनी सर्वांनाच घायाळ करत असते. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहेत. दिशाला मोठ्या पडद्यावर बघायला चाहते नेहमीच आतूर असतात. मात्र, दिशाला स्वत:ला स्क्रिनवर पाहायला अजिबात आवडत नसल्याचा खुलासा अभिनेत्री केला आहे.

मी माझे चित्रपट पाहताना डाळे बंद करून पाहते. लोकांना वाटत दिशा खूप परफेक्ट आहे, दिशा चांगले लूक्स देते आणि ती  स्क्रीनवरही तीतकीच परफेक्ट आहे. पण मला मात्र मी स्क्रीनवर अजिबात आवडत नाही. मला स्क्रीनवर मी अजिबात चांगली वाटत नाही. मला स्वत: चाच राग येतो मग मी डोळे बंद करून घेते, असं दिशा एका मुलाखतीत बोलताना म्हणाली. दिशाचं हे उत्तर ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.

दिशा पटानी लवकरच ‘एक विलन रिटर्न्स’मध्ये (EK Villain Returns) दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जून कपूर दिसणार आहेत. हा चित्रपट 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्षित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान बोलताना दिशाने हा खुलासा केला.

दरम्यान, ‘एक विलेन रिटेन्स’ शिवाय दिशा ‘योद्धा'(Yodha) या चित्रपटात दिसणार आहे. तर प्रभास आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukon)यांच्या चित्रपटातही ती दिसणार आहे. दिशाने ‘धोनी-द अनटोल्ड स्टोरी’मधून डेब्यू करून बॉलीवूडमध्ये स्वत:ची चांगलीच छाप पा़डली आहे. दिशा तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्समुळेही चर्चेत असते.

थोडक्यात बातम्या:

संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद

‘संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More