बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?”

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर तिथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लागली आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दंगे उसळले होते. यावरून देशभरात सर्वत्र टीका होतं होती. यावर आता शिवसेनेने देखील आपलं मुखपत्र सामनाच्या माध्यमातून टीका केली आहे.

‘दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तिथे दंगे उसळले होते आणि आता पश्चिम बंगालातही तेच घडलं आहे. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता? पश्चिम बंगालामध्ये शांतता, कायदा–सुव्यवस्था राखणे हे ममता बॅनर्जीं इतकेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे, याचा विसर कोणाला पडला आहे काय?’, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

2019 मध्ये बंगालात भाजपचे 18 खासदार निवडून आले. त्यानंतर जे उन्मादी राजकारण सुरू झाले, त्यातून अनेक ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले गेले. पश्चिम बंगालची ही परंपरा आहे, असे म्हणायचे तर मग रवींद्र संगीत, रवींद्रनाथ टागोर, बंगालची साहित्य–संस्कृती, सामाजिक सुधारणांचा प्रवाह, स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीची मशाल हे सर्व वाया गेलं काय? असं देखील यात म्हटलं आहे.

आम्हीच जिंकणार; आम्ही जिंकल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवर कुत्र्यांप्रमाणे गोळ्या मारू! या धमकीचा अर्थ काय असा सवाल विचारला आहे. तर डॉ. नड्डा हे संयमी नेते आहेत. त्यांचा पिंड आकांडतांडव करण्याचा नाही, पण बंगालचा पराभव पचवता येत नाही. याचे दुःख त्यांच्या मनात खदखदत असेल तर तो मानवी स्वभाव आहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहे”

मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून ‘ही’ खुशखबर

मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

कोरोना रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; राहुल गांधींच्या ‘या’ मागणीने धरला जोर

मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More