बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

नवी दिल्ली | आपल्या आजूबाजूला सतत कोणी तरी ह्रद्यविकारानं दगावल्याचं आपण ऐकत असतो. ह्रद्यविकाराचे प्रमाण वाढल्याचं आपल्या लक्षात येत असेल. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना हा त्रास जाणवत होता. पण अलिकडं तरूणांमध्ये ह्रद्यविकाराचं प्रमाण वाढल्यानं डाॅक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

तरूणांमध्ये वाढत चाललेल्या ह्रद्यविकारावर गेली 2 वर्षापासून संशोधन केलं जात आहे. या संशोधनाच्या माध्यमातून तरूणांमधील या रोगाचं प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. एसी हार्ट इन्स्टिट्यूटचे एमडी डाॅ रमाकांत पांडा यांनी याबाबत चांगली माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये 28 वर्षाचा तरूण रूग्णालयात दाखल झाला होता. त्याला कोरोनानंंतर ह्रद्यविकाराचा झटका आला होता. पण रक्त पातळ झाल्यानंतर तो वाचला, असं पांडा यांनी आपल्या निष्कर्षात म्हटलं आहे.

तरूणांमध्ये जास्त मद्यपान आणि धुम्रपान केल्यानं ह्रद्यविकाराचं प्रमाण वाढत आहे. जंक फुड आणि फॅडी फुड मुळं धमन्या जड होतात. परिणामी ह्रद्यरोगाचा धोका वाढतो, असं युरोपियन असोसिएशन ऑफ कार्डिओलाॅजीनं आपल्या संशोधनात म्हटलं आहे. परिणामी तरूणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

दरम्यान, सततच्या धगाधगीच्या जीवनात आपण आरोग्याकडं दुर्लक्ष करत आहोत. हे संशोधनातून अधोरेखित झालं आहे. लठ्ठपणामुळं सुद्धा ह्रद्यविकाराचा धोका उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“काँग्रेस लोकसभा निवडणूक जिंकणारच”, पी. चिदंबरम यांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

3 सेकंदात हत्या, 24 तासात गुन्हेगार जेरबंद; थरकाप उडवणारी घटना

बाॅलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा ‘वर्णभेद’ ही मोठी समस्या – नवाजुद्दीन सिद्दीकी

झुनझुनवालांसाठी ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर, 3 दिवसात कमावले 310 कोटी

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More