देश

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी FIR का नाही नोंदवला?- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी एक ट्वीट करून मुंबई पोलिसांनी अद्याप बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीत एफआयआर का नोंदविला नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एफआयआर का दाखल केला नाही? पोस्टमार्टम रिपोर्ट प्रोविजनल का म्हटले गेले? दोन्ही प्रश्नाचे एकच कारण आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना फॉरेन्सिक विभागाकडून सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे, जेणेकरुन सुशांतला विषबाधा झाली की नाही हे समजू शकेल. सुब्रमण्यम यांनी मुंबई पोलिसांनावर टीका करत मुंबई पोलिसांकडे 80 टक्के गुन्हांचा तपास सीबीआयकडे सोपवला जातो, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.

याआधी स्वामींनी ट्विटरवर सुशांत सिंग राजपूतची ‘हत्या’ झाली आहे असे त्यांना वाटत आहे, असं लिहिलं होतं. स्वामींनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे पोस्ट केली होती.

दरम्यान, स्वामींनी एका दस्तऐवजाचे फोटो ट्विट केले होते. ज्यात 26 पॉइंट्स होते. तसेच सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे. कागदपत्रांनुसार, सुशांतच्या गळ्यावरील खुणा आत्महत्येचे नव्हे तर हत्येच्या खुणा असल्याचं दिसत असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी…., राज्यपालांची महत्त्वाची सूचना

“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”

अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या