‘या’ लोकांनी का घेऊ नये कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
नवी दिल्ली | अनेक देशात वाढणारा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव जगाचं टेंशन वाढवत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात लस महत्त्वाचं शस्त्र असताना WHO ने कोरोनाच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत (Booster Dose) अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे त्यांच्यासाठी कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस अर्थात चौथा डोस आवश्यक आहे. या व्यक्तींमध्ये 60 वर्षांवरील नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सात अभ्यासांचा डेटा तपासला असता कोरोनाच्या बूस्टर डोसचा तरूणांना काहीच फायदा होत नसल्याचं WHOचं म्हणणं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या बूस्टर डोसचा तरूणांना काही फायदा होईल याबाबतची कोणतीही माहिती अभ्यासातून समोर आलेली नाही.
दरम्यान, पीटीआयने या संदर्भातील माहिती दिली आहे. तर तरूणांसाठी बूस्टर डोस अनावश्यक असल्याचं WHO नं यापूर्वीही सांगितलं होतं. ज्या लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे त्यांनी लसीच्या बूस्टर डोसचा फायदा आहे.
थोडक्यात बातम्या-
“पुरून उरेल तुम्हाला… चित्रा वाघ म्हणतात मला”
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिली महाविकास आघाडीत यायची ऑफर?, म्हणाले…
राज ठाकरेंची सभा होणार?, मनसे उद्या महत्त्वाची घोषणा करणार
‘…त्या धारेची किंमत मलाही मोजावी लागली’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
राष्ट्रवादीनंतर काँग्रेसची शिवसेनेवरही नाराजी, नाना पटोले म्हणतात…
Comments are closed.