बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

पाटणा | जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांच्या अटकेवरून आता बिहारमध्ये आता चांगलाच वाद पेटला आहे. मुख्यमंत्री नितिश कुुमार आणि पप्पू यादव यांच्यात हा वाद पेटलेला दिसत आहे. कोरोनाचा नियम मोडल्याप्रकरणी पप्पू यादव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 32 वर्ष जुन्या केसमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पत्नी रंजीत रंजन यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री नितिश कुुमार यांच्यावर टीका केली आहे.

“नितीशजी, पप्पूजी कोरोना निगेटिव्ह आहेत, जर ते कोरोना पाॅझिटिव्ह झाले असते तर, तुम्हाला आणि या कटात सहभागी चार लोक तसेच अॅम्ब्युलन्स चोरांना सीएम निवासस्थानातून काढून भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”, असं ट्विट रंजीत रंजन यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची देशभर चर्चा चालू आहे.

काल संपुर्ण दिवसभर जो तुमच्या प्रशासनाने पाटणा, मधेपुरा ते वीरपुरापर्यंत पप्पू यादव यांच्याबाबतीत जो ड्रामा केला आहे, तो ते पाहत आहेत. त्यांना अजूनही मेडिकल फॅसिलिटी मिळालेली नाही, असं दुसरं ट्विट रंजीत रंजन त्यांनी केलं आहे. पप्पू यादव यांच्या अटकेवरून आता चांगलाच वाद पेटला आहे. जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या अटकेविरूद्ध सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व माकडांच्या हाती आहे, अशी टीका जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी केली होती. तर दुसरीकडे पप्पू यादव यांचे तेजस्वी यादव यांच्यासोबत वाद आहेत.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

“टिकटॅाकसारखे व्हिडीओ बनवा पैसे कमवा”; यूट्यूबची मोठी घोषणा

अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका, “केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा…”

धोका वाढला! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, जाणुन घ्या आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More