बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने अत्यंत क्रूरपणे जे कृत्य केलं त्यानं सर्वांना हादरवून टाकलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे या घटनेमध्ये संबंधित पतीने त्याच्या मुलांवर देखील दया दाखवली नाही.

मुझफ्फरनगरमध्ये रहिवासी असणाऱ्या आरोपीची पत्नी गेल्या 15 दिवसांपासून आपल्या पतीला शरीर संबंध ठेवण्यास नकार देत होती. याच रागात जर आपल्या पत्नीने उद्या सकाळी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर तिची हत्या करण्याचं आदल्या रात्रीच ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी आरोपीने त्याच्या पत्नीला जवळ येण्यास सांगितल्यावर तिने नकार दिला.

ठरवल्याप्रमाणे पत्नीने नकार दिल्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून तिचा खून केला. यावरच आरोपी थांबला नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर आता आपल्या लेकरांचा सांभाळ कोण करणार?, असा विचार करुन आरोपीने आपल्या तीन पोरांना कालव्यात फेकून दिलं. यामध्ये आरोपीला दोन मुली आणि एक मुलगा आहे. संबंधित मुलींपैकी एकीचं नाव सानिया तर दुसरीचं नाव हर्षिता असं असून मुलाचं नाव वंश असं आहे.

दरम्यान, कालव्यात फेकण्यात आलेल्या लेकरांपैकी हर्षिता ही अवघ्या 15 महिन्यांची होती. या बाबतची माहिती स्थानिकांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कालव्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र मुलं न मिळाल्याने त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपीला गजाआड करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलगी हवी होती, मुलगा झाला; रागाच्या तडाख्यात दगडावर आपटून हैवान बापाकडून मुलाची हत्या!

क्रूरतेचा कळस! YouTuber ने कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवलं, पाहा व्हिडीओ

मुलासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला अन्…., पाहा व्हिडीओ

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका

पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More