नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. संपूर्ण जग कोरोना संकटातून बाहेर पडण्याची वाट पाहात असताना जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. यामुळे काळजीत भर पडली आहे.
कोरोनापेक्षा जास्त धोकादायक महामारी येऊ शकते. त्या संकटाचा सामना करण्याची तयारी जगानं करायला हवी. त्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलायला हवीत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दिला आहे.
कोरोनाचा विषाणू जगभरात वेगानं पसरला. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा परिणाम पाहायला मिळाला. मात्र ही महामारी सर्वात मोठी महामारी असेलच असं नाही, असं मायकल रेयान म्हणाले.
कोरोना विषाणूचं वेगानं संक्रमण झालं. त्याच्या फैलावाचा वेग जास्त आहे. या विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेला. मात्र अन्य रोगांचा विचार केल्यास कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे, असं रेयान यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
राम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल त्यांना गट-तट कळत असेल- रोहित पवार
अॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!
दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांच्या आज तारखा जाहीर होणार!
ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक- हसन मुश्रीफ
सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही- देवेंद्र फडणवीस