बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

पुणे | राष्ट्रवादीचे शरद पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाचा किस्सा शरद पवारांनी यावेळी सांगितला.

उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार म्हणाले आहेत. आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असंही शरद पवार म्हणाले आहेत. सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केलं होतं, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडेच राहणार. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. केंद्र सरकारने कितीही छापे टाकावेत, हे सरकार झुकणार नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यात होत असलेल्या तपास यंत्रणांच्या कारवाया आणि आरोपांवरून मोदी सरकारसह देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशातील महागाई वाढलेली आहे. तसेच केंद्र सरकारला जनतेविषयी आस्था नाही, अशी टीका देखील पवारांनी मोदी सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या –

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

‘राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि…’; शार्लिन चौप्राचा गंभीर आरोप

‘…म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

फडणवीस-मुंडे वाद पुन्हा शिगेला???; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांनी सोडली पत्रकार परिषद

…जेव्हा ‘द वाॅल’ म्हणतो, “तो माझ्यासाठी काही अभिमानाचा क्षण नव्हता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More