Top News

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

मुंबई | कर्जबुडवून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्ल्या याच्या जीवनावर आधारित लवकरच एक वेबसिरीज येणार आहे.

विजय माल्ल्याच्या जीवनावरील ‘द विजय माल्ल्या स्टोरी’ या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारित असणार आहे. हे पुस्तक के. गिरीप्रकाश यांनी लिहीलं आहे. या पुस्तकात त्याचे व्यावसायिक साम्राज्य, लग्नसंबंध यासंदर्भात लिहिण्यात आलं आहे.

गँग्स ऑफ वास्सेपूर, तनू वेड्स मनू, द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या गाजलेल्या चित्रपटांची निर्मीती करणाऱ्या सुनिल बोहरा यांच्या अलमायटी मोशन पिक्चर्सकडून या चित्रपटांचे हक्क विकत घेण्यात आले आहेत. याबाबतचे ट्विटअभिनेत्री, दिर्ग्दशक प्रभलीन कौर हीने केलं आहे.

दरम्यान, इतर वेब सिरीजच्या तुलनेत ही वेब सिरीज किती यशस्वी होते हे पाहणं औत्सुक्याचं असणार हे नक्की.

महत्वाच्या बातम्या-

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधान मोदींकडून संकेत

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

दिवंगत अभिनेता सुशांतला कॅलिफोर्नियाकडून मरणोत्तर पुरस्कार

स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलने बनवलंय हे एक खास डुडल

“आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या