बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-मनसे एकत्र येणार का?; राज ठाकरे म्हणतात…

पुणे | शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

परप्रांतीयांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे निर्णय पटले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. जे मला पटलं नाही, त्यावर मी टीका केली. स्पष्ट बोलण्यात चुकीचं काय आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

नाशिक दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली असल्यानं या युतीच्या चर्चा तुफान रंगताना दिसत होत्या. युतीविषयी बोलताना राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

दरम्यान, पुढेे राज ठाकरे यांनी म्हटलं की, तुम्ही प्रश्न निर्माण करायचे आणि आम्हाला उत्तरं द्यायला सांगायचे. युतीच्या बातम्या तुम्हीच तुमच्या रंगवता, मी जो काही आहे तो आहे, माझी भूमिका बदलत नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी अनेकदा हुकली – देवेंद्र फडणवीस

काश्मीरमधील ‘त्या’ शाळेसाठी अक्षय कुमारनं दिली आर्थिक मदत!

एकाच वेळी रस्ता ओलांडणारा हरणांचा कळप, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More