बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंनंतर कुणाचा नंबर?; ‘या’ नेत्यांवर अटकेची टांगती तलवार!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाचे चांगलेच राजकीय पडसाद उमटताना दिसत आहे. ही अटक सूडभावनेने झाल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे. राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी केंद्रात मात्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार विराजमान आहे, त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी होणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे.

राणेंना अटक करुन शिवसेनेनं तसेच महाविकास आघाडीनं भाजपला शह दिल्याची चर्चा आहे. क्रियेला प्रतिक्रिया देण्याची भाजपची पद्धत सर्वांना माहीत आहे, त्यामुळे अशाप्रकारे आपल्या मंत्र्याला अटक करण्यावर भाजप गप्प बसणार नाही, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचा फटका महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना नक्कीच बसू शकतो.

सध्याच्या परिस्थितीत १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, दुसरीकडे छगन भुजबळांची १०० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादीला लक्ष्य न करता शिवसेनेला लक्ष्य करायचं झालं प्रताप सरनाईकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे, याशिवाय अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी नुकतेच आरोप केले आहेत.

दरम्यान, भाजपचं सर्वोच्च नेतृत्त्व म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा नारायण राणे अटक प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या चालींना भाजपनं तशाच चालींनी उत्तर दिलं तर आगामी काळात आणखी काही नेत्यांना नक्कीच अटक झालेली पहायला मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास माझ्या वाघांनो… उद्धव ठाकरेंकडून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना शाबासकी!

“राज्य सरकारची झुंडशाही पाहून अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील”

नारायण राणेंना धक्क्यावर धक्के, पुन्हा अटक होणार?

शांत असलेले राऊत अखेर बोलले; “या भाडोत्रींनी भाजपलाच नागडं…”

आंदोलन राणेंविरुद्ध… गाढव, मांजर, कोंबड्यांचे मात्र प्रचंड हाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More