बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधनांवरील कर कमी होणार का?; केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्यावरून विरोधक सत्ताधारी पक्षावर सातत्याने आरोप करत आहेत. तसेच इंधनांवर लादलेले कर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराबद्दल मंगळवारी राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी पेट्रोल डिझेलच्या कराबद्दल मोदी सराकारने लिखित उत्तर दिलं. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकारच्या वतीनं हे लिखित उत्तर सभागृहात सादर केलं.

देशातील महसूल स्थिती सध्या चांगली नाही. सरकारला मिळणारा महसूल पाहूनच पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क लावलं जात आहे. देशभरात सध्या सुरु असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी लागणारा निधी कमी पडू नये, म्हणून केंद्र सरकारनं इंधनांवर उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ थांबवण्यात आली होती. मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री बसायला सुरूवात झाली आहे. यामुळे मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“भारताला पाकिस्तान बनवण्यासाठी 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली”

सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला होता राज कुंद्रा; जाणून घ्या वाघे-कुंद्रा केस कनेक्शन!

‘दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या’; अजित पवार मुख्यमंंत्र्यांशी करणार चर्चा

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More