बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती होणार?

नवी दिल्ली | येत्या 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. देशात राजकीय पक्षांकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार न देता विरोधी पक्षांच्या सहमतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रपती पदासाठी अनेक नावे चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवारांचे नाव पुढे येत आहे.

राष्ट्रपती पदासाठी शरद पवार तयार असतील तर आम आदमी पक्षाने पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेत्यांसोबत फोनवरून चर्चा केली आहे. त्यातच विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण दिलं आहे. या बैठकीमध्ये शरद पवारांचे नाव सुचविले जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार राष्ट्रपती झाले तर आनंदाची गोष्ट असेल आणि महाराष्ट्रासाठी ही गर्वाची बाब असेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचे नाव पुढे येत असेल तर काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देखील देशाच्या सर्वोच्च पदी शरद पवार असावेत, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान, भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. भाजप घटक पक्षांशी चर्चा करणा असून भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नावे चर्चेत आहेत.

थोडक्यात बातम्या-   

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

‘…तर मला आणि भाजपला मैदानात उतरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

“राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

“राखी सावंतने माझा फायदा घेतला, तिने माझं शोषण केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More