पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- माधुरी दीक्षित

मुंबई | आपण राजकारणात येणार असल्याच्या बातम्यांचं बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने खंडण केले आहे. 

आगामी लोकसभेसाठी भाजप तिला पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देणार, अशा बातम्या पसरल्या होत्या. परंतु या सर्व अफवा असल्याचं माधुरी दीक्षितच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी यावर्षीच्या जून महिन्यात ‘संपर्क फाॅर  समर्थन’ या अभियानांतर्गत माधुरी दीक्षितची भेट घेतली होती. 

दरम्यान, त्यावेळी अमित शाह यांनी मोदी सरकारच्या कामगिरीविषयी माहिती दिली होती, अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितच्या वतीने तिच्या प्रवक्त्याने दिली.

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

-महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत

-राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता

-भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?

-नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका