भाजपचं टेन्शन वाढलं! प्रियंका गांधींबाबत काँग्रेस लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. प्रियंका गांधी यांनी अनेक सभा आणि प्रचार रॅली केल्या होत्या. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातून मोठं जनसमर्थन मिळालं. त्यातच आता काँग्रेस पक्षाकडून प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश आणि इतर महत्त्वाच्या राज्यांमध्ये प्रचार केला आणि जनसमर्थन मिळाल्याने केंद्रातील मोदी सरकारला घेरण्यासाठी त्यांना संसदेत पाठवण्यात यावे, असा काँग्रेस पक्षामधील एक मतप्रवाह आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन वर्षांनी येत आहेत. त्यामुळे सरकारला थेट सामोरं जाण्यासाठी प्रियंका गांधी यांना पाठवण्याची ही योग्य वेळ असल्याचं समर्थकांनी म्हटलं आहे.
यापूर्वी अहमद पटेल हयात असताना प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठविण्याचा विचार केला होता. छत्तीसगडमधून राज्यसभेच्या दोन जागा होत्या. मात्र, भाजपकडून घराणेशाहीचा आरोप झाल्यामुळे प्रियंका गांधींना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यातच उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील प्रचारामुळे प्रियंका गांधी यांचं नाव देशभर चर्चेत आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात 42 रोड शो आणि डोर टू डोर प्रचारही केला. उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचाराची कमान प्रियंका गांधी यांच्या खांद्यावर होती. त्यांनी 100 पेक्षा अधिक रॅलींना संबोधित केले. महिलांसह अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लडकी हुँ, लड सकती हुँ ही प्रियंका गांधी यांची घोषणा चांगलीच गाजली. त्यांनी पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये प्रचार केला.
थोडक्यात बातम्या-
‘किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे वसुली एजंट’; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
“महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच धाडी का?, भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?”
‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, संजय राऊतांचा इशारा
‘ईडी ही भाजपची ATM मशीन आहे’; संजय राऊत कडाडले
“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
Comments are closed.