सोनिया गांधी अॅक्शन मोडवर; आगामी काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली | देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चार राज्यांमध्ये भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. पराभवानंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक देखील पार पडली. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी पक्षात मोठ्या बदलाचे संकते दिले आहेत.
संसदीय कामकाज मंडळाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींनी जी-23 नेत्यांनाही इशारा दिला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे तुम्ही नाराज आहात, याची मला कल्पना आहे. पक्षाचा पराभव आश्चर्यकारक आणि चिंतेचा विषय आहे. जी-23 नेत्यांना सोनिया गांधींनी सांगितले की, पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी अनेक सल्ले येत आहेत आणि यावर काम सुरू आहे.
काँग्रेस पक्षाने पुन्हा भरारी घेणे फक्त पक्षासाठी फायदेशीर नाही तर लोकशाहीसाठी आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटी बैठकीत चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. चिंतन शिबिरामध्ये काँग्रेस पक्षातील लोकांचे मत ऐकता येईल आणि त्यानुसार पक्षाची पुढील कार्यवाही करता येईल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी आपआपसातील मतभेद विसरून पक्षासाठी काम करायला हवे, असं आव्हान सोनिया गांधी यांनी नाराज नेत्यांना केलं आहे. भाजप देशात विभाजनकारी नीती अवलंबत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारविरूद्ध जमिनीवर संघर्ष आवश्यक आहे. काँग्रेस नेत्यांनी महागाई विरोधात आवाज उठवावा, असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून तुरूंगात पाठवा”
राजू शेट्टीचा महाविकास आघाडीला जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर मोठी कारवाई, तीन महिने कारावासाची शिक्षा
10 वी 12 वी च्या निकालाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर
“किरीट सोमय्या चु*** आहे, तो आम्हाला अक्कल शिकवणार का?”
Comments are closed.