बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronच्या भीतीनं परिक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?; उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

मुंबई | राज्यात नव्याने आलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्व विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. आता याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education minister Uday Samant) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

परिक्षा ऑफलाईन होणार की, ऑनलाईन याबाबत बोलताना उद्य सामंत म्हणाले की,”आगामी परिक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहून तेच याबाबत निर्णय घेतील”

उद्य सामंत यांनी यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीवरही भाष्य केलं आहे. कुलगुरु पदाच्या नेमणुकीसाठी आम्ही केंद्राची पद्धत अवलंबली आहे, जर आम्ही चुकत असू तर केंद्र पण चुकत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गेले काही दिवस विरोधक या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत.

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी 10 वी आणि 12 वीची परिक्षा ऑफलाईन होणार असल्याची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 वीची लेखी परिक्षा 4 मार्च रोजी होणार आहे. तर, 10 वीची लेखी परिक्षा 15 मार्चपासून सुरु होणार आहे. 10 वी आणि 12 वीची परिक्षा अधिक महत्त्वाची असल्याने हा निर्णय घेतला असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! Omicron संदर्भात एम्सनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

‘पालक म्हणून आम्ही आमच्या मुलीला…’; अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल

“मी नुसत्या बढाया मारत नाही, शिवसेनेचा धुव्वा उडवणारच”

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More