बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? ‘या’ दोन राज्यात सत्ता बदलाची शक्यता!

नवी दिल्ली | सध्या देशीतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांआधीच राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांत या निवडणुका होणार आहेत. त्यातच आता सी वोटरनं एबीपी नेटवर्कसाठी घेतलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक अंदाज समोर येत आहेत.

पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या राज्यांत कोणाची सत्ता पहायला मिळणार याचा एक अंदाज सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे आता सत्तेचा खेळ चांगलाच रंगणार असल्याचं चित्र दिसतंय.

कोणत्या राज्यात कोणाला किती जागा?

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाला 12-16 जागा जिंकण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाला 109-117 जागांवर आघाडी मिळू शकते. याशिवाय इतर पक्षांना 6-10 जागा मिळू शकतात.

पंजाब – पंजाबमध्ये धक्कादायक सर्वेक्षण हाती लागले आहेत. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. त्यातील आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला 38 ते 46, अकाली पक्ष 16 ते 24, भाजप आणि इतरांना 0 ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या वादामुळे काँग्रेसला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे.

उत्तराखंड – उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पार्टीला 0 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भाजपला 44 ते 48 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपची पकड मजबूत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसतंय.

मणिपूर – मणिपूरमध्ये येत्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार बनू शकतं. भाजप आघाडीला 32 ते 36 जागा मिळू शकतात. एनपीएफला केवळ 2 ते 6 जागांवर समाधान मानावं लागेल. 0 ते 4 जागा इतरांच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे.

गोवा – गोव्यातही भाजपची सत्ता येऊ शकते. 22 ते 26 जागा भाजपच्या खात्यात येणार असल्याचं दिसतंय. आम आदमी पक्षाच्या खात्यात 3-7 जातील. याशिवाय काॅंग्रेसला 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यात भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं दिसतंय.

दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकांचा राजकीय खेळ कोणाच्या पारड्यात जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्य़ात बातम्या – 

नेटकऱ्यांचा खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी वाहिली ‘या’ सुपरस्टरला श्रद्धांजली

मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला? वाचा निवडणुकीपूर्वी लोकांचं मत काय

राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुण्यात तब्बल 91 गावं कोरोनाची हाॅटस्पाॅट; ‘या’ तीन तालुक्यांना मोठा धोका

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नाट्यगृहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More