बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकांच्या विरोधानंतरही सरकार लॉकडाऊन लावणार? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई | संभाव्य लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर सध्या टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका मांडत लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची चिंता राज्य सरकारला आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं राज्य सरकार करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

संसाधनांची कमी पडू दिली जात नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधनं कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.

सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येईल. कोरोनासाठी सध्या निधीची कोणतीही अडचण नाही. अनेकजण कोरोना बाधित स्वत:ची काळजी घेत नाहीत आणि इतरांनाही बाधित करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचे काहीही लक्षण दिसली तर तातडीने चाचणी करा आणि उपचार सुरु केले पाहिजेत. जास्तीत लोकांनी लसीकरण केलं पाहिजे, असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं सरकारवर जोरदार निशाणा साधला. गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असं म्हणत या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली.

थोडक्यात बातम्या – 

“चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो”

मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More