बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

मुंबई | कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅनने (Omicron) आता जगभरात खळबळ माजवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता ओमिक्राॅनमुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Corona Wave) येणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. अशातच आता ओमिक्राॅनमुळे पुन्हा लाॅकडाऊन (Lockdown) लागणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत चालला असतानाच केंद्रीय आरोग्य सचिवांनी आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीचे पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची स्थिती नियंत्रणात रहावी, यासाठी आवश्यकतेनुसार तातडीने पावलं उचलावीत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

नाईट कर्फ्यूसह इतरही निर्बंधविषयी सुचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर वेगीच पावलं उचलली तर कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आणण्यास मदत होईल, असंही या पत्रात म्हटलं आहे. मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात यावं तर, लग्नसोहळा आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीवर मर्यादा घालाव्या, असंही या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशातील ओमिक्राॅनबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. नुकताच भारतातला हा आकडा 200च्या वर गेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

तालिबान्यांचा गजब कारभार! चुकून शत्रू राष्ट्रालाच पाठवले कोट्यवधी रूपये

चंद्रकांत पाटलांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज, म्हणाले ‘जनतेच्या मैदानातही…’

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More