बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात लाॅकडाऊन लागणार का?; अजित पवार म्हणाले…

मुंबई | कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचं संकट टळत नाही तोपर्यंतच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या ओमिक्राॅन (Omicron) व्हेरियंटनं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केलं आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता आता राज्यात महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते, असं तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्यात लाॅकडाऊन केलं जाईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागरिकांना इशारा दिला आहे.

ओमिक्राॅननं रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी निर्बंधांचे सक्तीनं पालन करावे असं वारंवार सांगण्यात येत आहे. सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

Omicronच्या पहिल्या लक्षणाचा प्रसार होण्यापहिलेच व्हा सावधान, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव हिचं निधन

“15 लाखांच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही,” भाजप खासदाराच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More