बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

पुणे | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकिकडे विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी रंगली असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमधील अंतर्गत कलह देखील आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं म्हणत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेला आज भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की, राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. एखाद्या विषयावर पवार साहेब एकदा बोलले की, त्या विषयावर आम्ही कोणी बोलत नाही.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी इतर मुद्द्यांवर देखील भाष्य केलं आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे त्या बैठकीविषयी मी काहीही जास्त सांगू शकत नाही.

थोडक्यात बातम्या – 

“लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा”

“आमची महानगरपालिका निवडणूकीची सगळी तयारी झाली आहे, लवकरच दौरे सुरू होतील”

सुशांतच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंकिताने शेअर केला आठवणीतील ‘हा’ भावनिक व्हिडीओ

कॉंग्रेसला मोठा झटका! प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र पक्षाला रामराम ठोकणार?

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारात, पाहा आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More