बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! दोन अक्षराच्या पत्यावरुन पोलिसांनी अडीच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

मुंबई | मुंबई एपीएस मार्केटमधून अडीच वर्षांपासून फरार आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन अक्षराच्या पत्यावरुन अडीच वर्षांपासून फरार आरोपी मुज्जफर उस्मान फ्रुटवाला याला अत्यंत चतुराईने पोलिसांनी अटक केली आहे.

वरवली नाका कर्नाटक असा खोटा पत्ता सांगून मागील सात वर्षांपासून मुज्जफर कलिंगड व्यापारी राजाराम माने यांच्याकडे काम करत होता. सात वर्ष प्रामाणिकपणे काम करून त्याने माने यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, संपूर्ण व्यापार आणि व्यवहार मुज्जफरच्या हातात देऊन माने कामानिमित्त दोन महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. या गोष्टीचा गैरफायदा घेत मुज्जफरने कलिंगड मौसमात मार्च 2018 ते जून 2018 या चार महिन्यात एक करोड 16 लाख 84 हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून पसार झाला होता.

घटनेनंतर, आरोपीचा सुरत शहरातील वरवली नाका एवढाच पत्ता पोलिसांच्या हाती लागला होता. पोलिसांनी कौशल्याने गुजरात मधील सय्यद वाडा, वरवली नाका, सुरत या परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पहिले वरवली बाजार परिसरातील मस्जिदितून आरोपीच्या काकाला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून आरोपीच्या सासरवाडीची माहिती काढली. सासरवाडीला आरोपीच्या मेव्हण्याकडे तपास केला तेव्हा मुज्जफर मुळगावी गेल्याच कळालं. आरोपी त्याच्या मुळगावी जाऊन सेल्समनचं काम करत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरून जाऊन त्याला ताब्यात घेतलं.

दरम्यान, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वत्स, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कामगिरी केली आहे.

थोडक्यात बातम्या

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

‘शार्ली हेब्दो’चं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र, वाचा काय आहे प्रकरण

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More