बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ऐट राजाची आणि वागणूक भिकाऱ्याची, अशी ठाकरे सरकारची अवस्था”

कोल्हापूर | राज्यात अलिकडेच अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी वित्तहानी तसेच जीवितहानी देखील झाली होती. बुधवारी झालेल्या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची घोषणा केली. त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अपूरी ठरत आहे. त्यामुळे ऐट राजाची आणि वागणूक भिकाऱ्याची सध्या सरकारची अवस्था झाली आहे. तटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या जीआरची 20 ऑक्टोबर रोजी होळी करणार आहे. तसेच सरकारने मदत देऊन शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरवला आहे. त्यामुळे मी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सरकारविरोधात शेतकरी परिषद घेणार आहे, असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या महिन्यात पावसानं राज्यात थैमान घातलं होतं. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाचा जोरदार फटका बसला होता. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई  देण्याची मागणी केली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून…’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

…म्हणून मी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली; हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा

‘आपण फक्त टगे पोसतोय, हे त्यांना समजलं पाहिजे’; प्रीतम मुंडेंचा घणाघात

‘…तर शिवसेेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते’; शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More